|| मूर्तिविशेष ||

जानेवारी 5, 2013

कसबा गणपतीची ही मूर्ती गजाननाच्या ओळखीच्या स्वरुपापेक्षा खूपच वेगळी आहे.
सततच्या शेंदूरलेपनामुळे मूळ मुर्ती त्या लेपनात लुप्त झाली आहे.
ह्या गजाननाच्या डोळ्यांच्या ठिकाणी हिरे आणि नाभिकमलात माणिक जडविण्यात आले आहे.
देवाची नित्य उपयोगातील उपकरणी चांदीची आहेत, यात मखर , प्रभावळ, मुकुट, चंद्र, गंध, रिद्धी, सिद्धी यांचा समवेश आहे.
दिवसातुन दोनदा गजाननाची पूजा होते. विशेष दिवशी जसे की, विनायकी, संकष्टी चतुर्थी, रंगपंचमी, वर्षातील तीन गणेशोत्सव (माघ, ज्येष्ठ, आणि भाद्रपद) गणपतीला “पोशाख” करण्यात येतो. भाविकांच्या श्रद्धेचे पारणे फेडणा-या पोषाखाचे स्वरुप म्हणजे, देवाला सोवळे, भरजरी शाल, मुकुट, व अनेक अलंकार असे असते.

देवापूढे दोन पुरुषभर उंचिच्या समयांमध्ये अहोरात्र नंदादीप तेवत असतो.
गाभा-यात मुख्य देवतेशिवाय, नंदी-महादेव, दत्त, देवी यांच्या मुर्ती आहेत.
तसेच बाहेरच्या बाजूला हनुमानाचे छोटेखानी मंदीर आहे.

कसबा गणपती मंदिराचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे रोज रात्री महासाधू मोरया गोसावी यांची पदे अत्यंत भक्तिभावाने, उत्साहाने आणि मुख्य म्हणजे नित्यनेमाने गायली जातात. या संकेतस्थळावर श्री मोरया गोसावी यांच्या पदांचा संग्रह सर्व भक्तगणांसाठी उपलब्ध करुल दिला आहे. त्यातील अत्यंत रसाळ व श्रद्धेने ओथंबणारी पदे भाविकांनी अवश्य वाचावीत.

Advertisements