|| ग्रामदैवत श्री कसबा गणपती ||

सप्टेंबर 29, 2012

श्री कसबा गणपती याचे मूळ नाव “श्री मोरया” असे आहे.

त्यानंतर श्री छत्रपती शिवरायांच्या काळात ह्या मोरायाचे नाव त्यांनी “श्री जयति गजानन” असे ठेवले. त्याचा उल्लेख आजही आहे.

श्री जयति गजानन म्हणजे जय मिळवून देणारा गजानन !

शिवरायांना अनेक महत्त्वाच्या गोष्टींत यश व विजय मिळवून देणारा हा गणपती, आजही त्याच्या भक्तगणांना याची प्रचिती देतो आहे.

इतिहास तज्ज्ञांच्या मते ७०० वर्षांपासून पुण्यनगरीत श्री गणेशाचे पुजन होत आहे. म्हणजेच यादवकाळापासुन, पुणे हे महाराष्ट्रतील पहिले गाव असेल की जेथे श्री गणेशाचे वास्तव्य निरंतर आहे.ह्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत, यादव राजवटीच्या कालखंडानंतर, निजामाच्या कारकिर्दीतही श्री मोरयाचे पुजन होत आले आहे.

आजचा कसबा गणपती, श्री जयति गजानन, याचे अस्तित्व इसवी सन १६१३ पासुन म्ह्ण्जे अगदी निजामशाहीपासून असल्याचे सिद्ध झाले आहे.

ह्या गजाननाची पूजाअर्चा व इतर व्यवस्था शिवकालापासुन ठकार घराण्याकडे परंपरेने आहे.

या परंपरेचे पालन करीत, आजही मंदिरात सर्व उत्सव (माघ, ज्येष्ठ आणि भाद्रपद) मोठ्या थाटात साजरे होतात. ह्याचा उल्लेख श्री गणेश कोशातही केलेला आढळतो.(पहा पृष्ठ १६०).

गजाननाचे हे प्राचीन देवस्थान सर्व भाविकांच्या भक्तिभावाने अत्यंत जागृत असे असुन, श्रद्धाळुंना त्याची नित्य प्रचिती येत असते.

मंदिरात आजही श्रींची सकाळ आणि दुपारी पुजा, रात्री आरती व धुपार्ती, विशेष प्रसंगी पोषाख असा नित्यक्रम असतो.

या मोरयाचा कृपाप्रसाद समस्त भाविकांना प्राप्त व्हावा यासाठीच ह्या संकेतस्थळाच प्रपंच आहे.

॥ माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥

Advertisements